शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन वाढवावे : गणपतराव पाटील

शिरोळ : बहुतांश शेतकरी अद्याप पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने पीक उत्पादनात घट होऊ लागली आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्राचा अवलंब करावा. तसे केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकतील, असे मत शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले. इंगळीत (ता. चिकोडी, जि. बेळगाव) दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघातर्फे आयोजित ऊस पीक चर्चासत्रात ते बोलत होते.

ज्येष्ठ कृषितज्ज्ञ अमर देशमुख म्हणाले, ऊस लागवड चार फूट सरीवर करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. शेतीतील नवीन तंत्रज्ञान अद्याप या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाते. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माती परीक्षण तज्ज्ञ पाटील नी जमिनीची सुपीकता टिकून हण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण रून उसाची लागवड करावी, असे आवाहन केले. यावेळी अमर यादव, माती परीक्षण तज्ज्ञ ए. एस. पाटील, अनिल पाटील, ज्ञानदेव जाधव आदी होते. राजाराम माने यांनी स्वागत केले. अनिल चौगुले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here