पुढच्या गाळप हंगामात शेतकर्‍यांना कोणतीही समस्या येवू नये: सहेंद्र सिंह

बागपत : छपरौली आमदार सहेंद्र सिंह रमाला यांनी सोमवारी रमाला कारखान्याच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. ते म्हणाले, या हंगामात अनेक समस्या आल्या, पण पुढच्या हंगामामध्ये शेतकर्‍यांना कोणत्याही समस्या येवू नयेत. यासाठी अधिकार्‍यांनी त्या समस्या कमी करण्यासाठी काम करावे.

छपरौली आमदार सहेंद्र सिंह यांनी रमाला सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आरबी राम तसेच उत्तम ग्रुपचे उपाध्यक्ष हरनाम सिंह तसेच प्लांट मॅनेजर अश्‍वनी तोमर यांच्याबरोबर बैठक घेतली. पूर्वीच्या 2019-20 च्या गाळप हंगामाबाबत विचार करताना आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये रमाला सहकारी साखर कारखान्याच्या क्षमतेबाबत माहिती घेतली. आमदार म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या हेतुने शासनाने 328 करोड रुपये मंजूर केले होते. ज्यासाठी आमदार यांनी उत्तम ग्रुपचे उपाध्यक्ष हरनाम सिंह यांना माहिती देण्यास सांगितले.

त्यांनी 328 करोड रुपयांच्या निधीची जमा आणि खर्चाची माहिती घेतली. आमदारांनी ही देखील माहिती घेतली की, उर्वरीत निधीचा पुढच्या हंगामामध्ये कसा उपयोग केला जावा. या साठी हरनाम सिह यांनी लवकरच या मंजूर निधीचा सगळा आढावा उपलब्ध करुन द्यावा असे सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here