सांगली : चीनी मंडी
ऊस दरा संदर्भात आंदोलन करून साखर कारखानाने बंद पाडले तर, शेतकऱ्यांचा ऊस पडूनच राहील आणि शेतकऱ्यांचेच नुकसान होईल, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. साखर कारखान्यांना यावर्षी पॅकेज शक्य आहे, पण, भविष्यात ते देता येणार नाही. शेतकऱ्यांनीही आता विचार करून ऊस लावणे बंद करावे, असा सल्ला गडकरी यांनी दिला.
सांगली दौऱ्यावर असलेले मंत्री गडकरी यांनी विविध विकासकामांच्या उद् घाटनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
ऊस दरासंदर्भातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत साखर कारखान्यांचा राजकारणासाठी वापर होत आहे. कारखाने म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली आहे. त्यामुळे आता आंदोलकांनीची शहाणे होण्याची गरज आहे. कोणताही प्रश्न तुटे पर्यंत ताणवू नये. आंदोलन करून कारखाने बंद पाडले तर, नुकसान शेतकऱ्यांचेच होईल.’
साखर कारखाना सुरू करून आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केल्याची कबुली मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली. गेल्या जन्मी जे पाप करतात ते या जन्मी साखर कारखाना सुरू करतात, अशी टिप्पणी गडकरी यांनी यावेळी केली.