लातूर : यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ऊर्ध्वमनार प्रकल्पासह आजूबाजूच्या साठवण व छोट्या मोठ्या पाझर तलावामध्ये मुबलक पाणीसाठा होऊ लागला आहे. त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा सिध्दी शुगर कारखान्याला ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक, माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.
उजना येथे सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गळीत हंगाम २०२४-२५ साठी रोलर पूजनाचा कार्यक्रम सोमवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री जाधव व सिध्दी शुगरचे संचालक सुरज पाटील यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. रोलर पूजन समारंभाला कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ, टेक्निकलचे जनरल मॅनेजर बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टिलरी) एस. बी. शिंदे, चिफ फायनान्स ऑफिसर डॉ. आनंद पाटील, कंपनी सेक्रेटरी एस. टी. सावंत, प्रशांत पाटील, आकुस्कर, डिस्टिलरी मॅनेजर सागर जाधव, डे. चिफ इंजिनिअर मुलानी इन्स्ट्रमेंट इंजिनिअर लोखंडे, डे. चीफ केमिस्ट शामराव लकडे, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, बापुसाहेब जाधव, संतोष कदम, प्रताप फाजगे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.