साखर उतारा तपासणीसाठी सक्षम यंत्रणा आवश्यक

पुणे : एफआरपी चा दर हा साखर उताऱ्यावर ठरतो, पण पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही त्यामुळे तशी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने केली. तसेच कारखान्याकडून एफआरपी रक्कम थकीत असून सुमारे एक हजार कामगारांचे २७ महिन्याचे वेतन
थकीत आहे, ते त्वरित देण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर आयुक्त सौरभ राव म्हणाले की, थकीत एफआरपी प्रश्नी जप्तीची कारवाई आणि अन्य मागण्यांबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई लवकरच करण्यात येईल.

साखर आयुक्त राव यांची प्रहार शेतकरी संघटनेच्या ५० हून अधिक शेतकऱ्यांनी भेट घेतली आणि कारखान्यांकडील थकीत एफआरपीच्या रक्कमा त्वरित देण्याची मागणीही केली. प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते शंभूराज खलाटे यांनी सांगितले की, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सहकारी साखर कारखानदारीतील व्यक्तीमत्व आहे. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे. चालुवर्षाच्या ऊस गाळप हंगाम २०१९-२० मधील शेतकऱ्यांच्या ऊसा च्या एफआरपीची सुमारे एक हजार कोटी रुपये अद्यापही देणे बाकी आहे. चालू वर्ष तसेच मागील थकीत एफआरपीची रक्कम सुमारे चारशे कोटींच्या आसपास आहे. शेतकऱ्यांच्या एफआरपीची थकीत रक्कम संबंधित कारखान्यांनी व्याजासह द्यावी, अशीही मागणी आयुक्तांकडे केली आहे.

कारखान्याकडून ऊसाची रक्कम थकीत आहे. या कारखान्याला यंदाचा ऊस गाळप परवाना नुकताच दिल्याचे समजले आहे. जोपर्यंत एफआरपीची जुनीरक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत याकारखान्याचा ऊस गाळप परवाना रद्द करावा. कारणएफआरपीच्या रक्कमेपोटी शेतकऱ्यांना दिलेले चेकही न वटताच बँकेतून परत आल्याची माहिती आम्ही
आयुक्तांना दिली आहे, असेही खलाटे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, सह संचालक मंगेश तिटकारे, पुणे प्रादेशिक साखर सह संचालक धनंजय डोईफोडे व अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here