बिजनोर : बिलाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. जर पैसे मिळत नसतील तर शेतकरी कारखान्याला ऊस पुरवठा केला जाणार नाही असा इशारा भाकियू अराजकीयचे युवा प्रदेशाध्यक्ष चौधरी दिगंबर सिंह यांनी दिला. महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद कुमार सिंह आणि उप जिल्हाधिकारी मोहित कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिगंबर सिंह यांनी कारखान्याने जादा दराने रस विक्री करून कमी मूल्य दाखवण्याचा प्रकार उघडकीस आणला. याबाबत कारखान्याने तीन जुलैपर्यंत उर्वरीत पैसे भरले गेले नाहीत तर चार जुलै रोजी एफआयआर नोंदवला जाईल असा इशारा उपजिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जादा दराने ऊसाचा रस विक्री करुन त्याचे कमी बिलिंग झाल्याच्या प्रकरणी कारखान्याला तीन जुलैपर्यंत मुदत देण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस बिलाई कारखान्याचे इतर अधिकारी, भाकियू अराजकीयचे पदाधिकारी उपस्थित होते. दिगंबर सिंह म्हणाले की, बिलाई कारखाना रसाची विक्री ५०० रुपये प्रती क्विंटल दराने करत आहे. मात्र, बाजारात ९५० रुपये दर आहे. प्रती क्विंटल ४५० रुपये रस विक्रीत घोटाळा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
बैठकीत शेतकऱ्यांनी विजेची समस्या मांडली. धरणांतून पाणी सोडले जात नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. भाकियूचे जिल्हाध्यक्ष चौधरी नितिन सिरोही, अतुल कुमार, गौरव कुमार जिंघाला, अरविंद राजपूत, तेजवीर सिंह, अंकित कुमार, सुरेंद्र सिंह, राकेश प्रधान, उत्तम सिंह, दर्शन सिंह फौजी, उदयवीर सिंह आदी उपस्थित होते.