महराजगंज : ऊस विकास परिषदेने ऊस शेतकर्यांना शेतात ऊस जाळायचा नाही, असा आदेश लागू केला आहे. ऊस शेतात जाळला तर शेताच्या क्षेत्रफळाप्रमाणे दंड वसुल केला जाईल.
जिल्हा ऊस अधिकारी जगदीशचंद्र यादव यांनी सांगितले की, पीकाच्या अवशेषांना जाळण्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे, कारण हा कायद्याने गुन्हा आहे. ऊसाची पाने जाळल्यानंतर संबंधित शेतकर्यांना मोठा दंड द्यावा लागेल. शेताचे क्षेत्रफळ दोन किंवा दोन एकरापेक्षा कमी असेल तर 2500/ रुपये, दोन एकरपेक्षा जास्त असेल तर 5 हजार रुपये आणि पाच एकर पेक्षा अधिक असेल तर 15,000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल.
त्यांनी पीकाच्या अवशेषांना जाळल्यानंतर होणार्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगितले की, प्रति एकर शंभर किलोग्रॅम कार्बन जळून खाक होते. शिवाय नाइट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅश आणि सल्फर सारखी पोषक तत्वे कमी होतात. पीक जाळल्यानंतर वायू प्रदूषणही होते. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना याबाबत जागरुक करण्यासाठी सर्व समिती सचिवांना निर्देश दिले गेले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.