शहांजहांपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोशल मीडियाशी जोडले जाणार आहे. त्यांना डिजिटल ऊस तोडणी पावती देण्यासह विभागीय आणि इतर माहिती देऊन हायटेक केले जाणार आहे.
ऊस अधिकारी खुशीराम यांनी सांगितले की, साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी योजनांच्या माहितीसह विविध माहितीशी जोडले जाणार आहे. जिल्ह्यात यासाठी अभियान राबविण्यात आले आहे. शाहजहापूर जिल्ह्यातील १.८० लाख ऊस उत्पादक शेतकरी शेतीशी संबंधित एम किसान अभियानाशी जोडले गेले आहेत. त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून माहिती दिली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे अॅंड्रॉईड मोबाईल आहे, त्यांना फेसबुक, ट्विटर, यूट्यूबशी जोडून अकाउंट सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात २८,५४० शेतकरी फेसबुक तथा २१५० शेतकऱ्यांना ट्वीटरशी जोडले गेले आहे.