देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणे आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या अनुषंगाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. योजनेअंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. सरकारकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत १२ हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ व्या हप्त्याचे पैसे जमा होवू शकतात. देशभरातील कोट्यवधी शेतकरी नव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रसार माध्यमांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात तेरावा हप्ता जारी करू शकते. सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल. तर, योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुम्ही नाव तपासून पाहा. यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल. यासाठी पीएम किसान पोर्टलला भेट देवून तेथे फार्मर्स कॉर्नरवर जावे लागेल. येथे लाभार्थी यादीत जाऊन तुमचे नाव तपासा. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी अद्याप झालेली नाही, त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप योजनेसाठी ई-केवायसी केलेली नाही. त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.