शेतकऱ्यांना स्वस्त दरात भाड्याने मिळणार कृषी यंत्र

सहारनपूर : लघू आणि अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी स्वस्त दरात भाड्याने कृषी यंत्र मिळणार आहेत. त्यासाठी विभागातील १५ ऊस विकास समित्यांनी कृषी यंत्रांसह ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. विभागात साधारणपणे ५.५० लाख शेतकरी ऊस शेती करतात. यात सर्वाधिक संख्या लघू व अल्प भूधारक शेतकऱ्यांची आहे. ऊस शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्राचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी यंक्षत्रांची गरज भासते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस समित्यांनी फार्म मशीनरी बँक योजनेअंतर्गत कृषी यंत्रांची खरेदी केली आहे. यामध्ये मल्चर, पेरणीसाठी स्ट्रेंच ऑपनर, स्प्रे टँकर, खोडवा व्यवस्थापनासाठी रेटून मॅनेजमेंट डिव्हाईसचा समावेश आहे. या यंत्रांचा वापर करण्यासाठी ट्रॅक्टरही खरेदी करण्यात आले आहेत. स्वस्त दरात भाड्याने ही यंत्रे शेतकऱ्यांना दिली जातील. यातून ऊस पिकाचा खर्च कमी करण्यास मदत मिळेल. याबाबत ऊस उपायुक्त ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले की, फार्म मशीनरी बँक योजनेअंतर्गत विभागातील १५ ऊस विकास समित्यांना कृषी यंत्र आणि ५५ हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टर देण्यात आले आहेत. प्रती तास २२ रुपये यासाठी भाडे असेल. ट्रॅक्टरचे भाडेही लवकरच निश्चित होईल. त्यामुळे शेती करणे सोपे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here