‘स्वभिमानी’च्या लढ्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 1 अब्ज रुपये!

कोल्हापूर : शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावेत, यासाठी गेले दोन महिने साखर कारखानदारांविरोधात रान उठविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामात गाळप केलेल्या उसासाठी सुमारे 98 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1 अब्ज रुपये मिळणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसासाठी 400 रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, मात्र कारखानदारांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नव्हत्या. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने तीन बैठका झाल्या, पण तीनही बैठका निष्फळ ठरल्या होत्या. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ने राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला.

चक्काजाम दिवशी यंत्रणा वेगाने हलली. कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत फोनाफोनी झाली. पडद्यामागे बरीच सूत्रे फिरली. अखेर सायंकाळी सहानंतर सर्वमान्य तोडगा निघाला. तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 100, तर त्यापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी 50 रुपये देण्यावर एकमत झाले. येत्या दोन महिन्यात साखर आयुक्तांची परवानगी घेऊन हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून सुमारे 98 कोटी रुपये मिळणार आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, जवाहर व दत्त कारखान्याला मागील हंगामात गाळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना तब्बल 29 कोटी मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘गुरुदत्त’ला 7.03 कोटी, तर ‘शरद’ला 6.05 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

कारखानानिहाय अशी द्यावी लागणार रक्कम (आकडे कोटीत) :

आजरा : 1.68

भोगावती : 2.29

राजाराम: 2.09

शाहू : 4.56

दत्त-शिरोळ : 11.48

बिद्री : 4.40

जवाहर – हुपरी : 18.01

हमीदवाडा : 2.30

कुंभी : 3.00

पंचगंगा (रेणुका शुगर्स) : 4.13

शरद : 6.05

वारणा : 6.74

अथणी (गायकवाड) : 3.79

डी. वाय. पाटील: 2.35

दालमिया : 5.07

गुरुदत्त : 7.03

इको केन, चंदगड : 1.73

ओलम ग्लोबल, राजगोली: 3.31

संताजी घोरपडे : 3.42

अथणी (तांबाळे) : 1.72

अथर्व (दौलत): 2.02

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here