मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश: मुजफ्फरनगर मध्ये भारतीय किसान यूनियनच्या प्रतिनिधी मंडळाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ मध्ये त्यांच्या कालिदास मार्गावर असणार्या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चे दरम्यान ऊस थकबाकी, ऊस दर वाढवणे आणि भूसंपादनाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधीमंडळाला आश्वासन दिले की, नव्या हंगामापूर्वी शेतकर्यांचे पैसे त्यांना दिले जातील. प्रकल्पांच्या निर्माणामध्ये अधिग्रहीत केलेल्या जमीनीचा ताबा घेण्यासाठी पीक कापणीपर्यंत शेतकर्यांना वेळ दिला जाईल. भाकियू नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, कृषी बिलांच्या विरोधात 25 सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन केलें जाईल.
बुधवारी भाकियू प्रतिनिधीमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आज प्रदेशातील शेतकरी पैशाच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. ऊस शेतकर्यांचे पैसे न मिळाल्याने शेतकर्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ऊस दर वाढलेला नाही पण, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, ज्यामुळे ऊस शेतकर्याचे नुकसान होत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.