डोईवाला : ऊस पिकामध्ये कन्सुआ आणि खोड किडींचा फैलाव झाल्याने डोईवालाचे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या रोगामुळे ऊस पिक वाळत असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यावर कृषी विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या काही काळापासून डोईवालातील मारखमग्रांट परिसरातील ऊस शेतीला मोठा फटका बसत आहे. येथील उसाचे पिक करपत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी इंद्रजित सिंह आणि रणजित सिंह यांनी सांगितले की, विभागातील बहुतांश शेतकरी ऊस पिकावर अवलंबून आहेत. मात्र, सद्यस्थितीत ऊस पिकावर रोगांचा फैलाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना यावरील उपाय शोधण्याची विनंती केली आहे.
तर डोईवालाचे सहायक कृषी अधिकारी डी. एस. अग्रवाल यांनी सांगितले की, या रोगांबाबतची माहिती त्यांना मिळाली आहे. कन्सूआ आणि खोडावर किडींचा हल्ला होत आहे. त्यामुळे ऊस वाळतो. त्यासाठी शेतकऱ्यांना कोरोजन आणि क्लोरो पायरोपास याचे मिश्रण करून ते पाण्यातून पिकांवर फवारण्याची गरज आहे. एक लीटर पाण्यात तीन मिली किटकनाशक फवारणी केली तर ऊस पिकावरील रोग दूर होईल असे त्यांनी सांगितले.