नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची पुन्हा भीती पसरू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४०,९५३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १८८ जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर गेल्या दिवसभरात २३,६५३ जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,१५,५५,२८४ झाली आहे. तर आतापर्यंत १,११,०७,३३२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या २,८८,३९४ इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १,५९,५५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणाची मोहीम गतीमान झाली आहे. आतापर्यंत ४,२०,६३,३९२ जणांना लस देण्यात आलीआहे. गेल्या २४ तासांत २७ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. आता ज्येष्ठ नागरिकांना व्हॅक्सिन दिले जात आहे.
मार्च महिन्यात देशात कोरोना संक्रमण गतीने फैलावले आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत वाढते रुग्ण पहाण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशसह काही राज्यांत शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाउन केले आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांत कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू केल्याचे जाहीर केले आहे.