जप्तीच्या भीतीने साखर कारखान्यांकडून अडव्हान्स जमा; ‘स्वाभिमानी’चा एकरकमीसाठी हट्ट

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर चीनी मंडी

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी कारवाईच्या भीतीने शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे थकविल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर कारखाने जागे झाले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र एक रकमी एफआरपीचा आग्रह कायम धरला आहे. टप्प्या टप्प्याने एफआरपी घेण्यास संघटनेने नकार दिला असून, आठवडाभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  

साखर आयुक्तालयाच्या कोल्हापुरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन-तीन दिवसांत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दबावानंतर सरकारने कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याचे आदेश दिले. त्याची कारखान्यांनी धास्ती घेतली आहे.

एक रकमी एफआरपीचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. शेतकरी संघटनांचा दबाव असला तरी, कारखान्यांनी अडव्हान्स म्हणून २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले आहेत. ही रक्कम एफआरपीच्या ५०० रुपये कमी आहे.

साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखर कारखाने कोणत्याही परिस्थितीत एक रकमी एफआरपीची मागणी मान्य करण्यास तयार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुका पाहता शेतकऱ्यांच्या रोष कमी करण्यासाठी कारखान्यांनी त्यांच्या खात्यांवर अडव्हान्स जमा केला आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, राज्य सरकारने साखर जप्त करण्याच्या कारवाईचे आदेश दिल्यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांनी, २ हजार २०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण थकबाकी ३१ जानेवारीपर्यंत ३ हजार ११४ कोटी रुपये होती. आता ही थकबाकी १ हजार २०७ कोटी रुपयांवर आली आहे.

साखर उद्योग आर्थिक संकटात असल्यामुळे कारखान्यांना सरकारकडून पॅकेजची अपेक्षा होती. मात्र, पॅकेजच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची एफआरपी थकली. त्यामुळे एफआरपी थकविलेल्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून नोटिस पाठविण्यात आली आहे. एकही रुपया एफआरपी न दिलेल्या सांगली जिल्ह्यातील एका कारखान्यानेही शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा केल्याची माहिती आहे. 

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

 

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here