सुवा:साखर उद्योग मंत्रालयाने नव्या आर्थिक वर्षात ७६.१ मिलियन डॉलरच्या निधीत वाढ केली आहे.गेल्या बजेटमधील ४४.९ मिलियन डॉलरमध्ये तब्बल ३१.२ मिलियन डॉलरची वाढ झाली आहे.अर्थमंत्री बिमान प्रसाद यांनी सांगितले की, मंजूर केलेल्या ७६ मिलियन डॉलरपैकी ६६ मिलियन डॉलरची कृषी विकास, खते आणि ऊस तोडणी वाहतूक अनुदान, विकासकामे, लीज प्रीमियम, यांत्रिकीकरण, पिक अनुदान आणि भारतीय एक्झिम बँकेच्या कर्जासाठी परतफेडीला मदत होईल.
मंत्री प्रसाद म्हणाले की, गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांना सर्वाधिक ९१.३८ डॉलर ऊस दर दिला होता.यंदाच्या हंगामात हा दर वाढून १०२ डॉलर प्रती टन झाला आहे.ऊस उत्पादक परिषदेला बळकटी देण्याचा सरकारचा उद्देश आहे.त्यासाठी ऊस उत्पादक परिषदेच्या निवडणुकीसाठी २,००,००० डॉलर आणि परिषदेच्या व्यवस्थापनासाठी ८.००,००० डॉलर निधी दिला जाईल.फिजीच्या शुगर रिसर्च इन्स्टिट्यूटला १.१ मिलियन डॉलर मंजूर करण्यात आले आहेत.तर शुगर ट्रिब्यूनलला ४,००,००० डॉलर देण्यात आले आहेत.