फिजी: फिजी शुगर कॉर्पोरेशन ने शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चांगल्या दर्जाच्या ऊसाचे उत्पादन करण्यास सांगितले आहे. कार्पोरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून कारखान्यांना पाठवण्यात येणाऱ्या ऊसाचा दर्जा चांगला असला पाहिजे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मिश्रण नसावे. ते म्हणाले, यंदा चांगल्या दर्जाच्या साखर उत्पादनाचे आमचे लक्ष्य आहे. कारखान्यात ऊस गाळपाची पूर्ण व्यवस्था झाली आहे.
क्लार्क म्हणाले, ऊस शुध्द असला पाहिजे, तरच आम्ही उत्तम दर्जाची साखर उत्पादित करु शकू. तसेच ऊस तोडणीसाठी ज्या लोकांना पैशाची गरज आहे त्यांनी यावे. ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या संधीचा लाभ घेउन आपण सारे या इंडस्ट्री ला पुढे नेऊ.
फिजी मध्ये जून महिन्यात ऊस तोडणी सुरु होईल आणि जुलै मध्ये हा ऊस गाळपास जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.