सुवा : पश्चिम विभागाचे आयुक्त मेसाके लेदुआ आणि उत्तर उरिया विभागाचे आयुक्त रैनिमा यांनी साखर उद्योगाच्या भागधारकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. आगामी गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण व सागरी विकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बैठकीत गळीत हंगामादरम्यान येणाऱ्या अडचणी, प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडविण्याविषयी चर्चा करण्यात आली.
शुगर ट्रिब्यूनलने २०२१ या गळीत हंगामातील तारखांची घोषणा केली आहे. लुटोका कारखाना ४ जूनपासून गाळप सुरू करणार आहे. तर रारावईकडून २३ जूनपासून कामकाज सुरू केले जाईल. लाबासा कारखान्यामध्ये ७ जुलै २०२१ पासून गाळप सुरू केले जाणार आहे.
दरम्यान, शुगर ट्रिब्यूनलचे रजिस्ट्रार टिमोथी ब्राऊन म्हणाले, ऊस उत्पादकांनी कारखान्यांना पाठविण्यासाठी एक दिवस आधी उसाची तोडणी करावी. त्याच्या वाहतुकीसही आधीच सुरुवात करण्याची गरज आहे.