सुवा : इथेनॉल उत्पादनामध्ये फिजी भारताच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आणि आता फिजी सरकारने दुसऱ्या साखर कारखान्याऐवजी रकीराकीमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. फिजीचे साखर मंत्री चरण जीत सिंह यांनी सांगितले की, इथेनॉल प्लांट फिजी शुगर निगमसाठी उत्पन्न मिळवून देईल. ते म्हणाले की, या उत्पन्नामुळे एफएससीला सरकारवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. ते म्हणाले की, रकीराकी प्लांटमध्ये इथेनॉल उत्पादन केले जाईल. आणि आम्ही जेव्हा भारताचा दौरा केला, तेव्हा तेथे पाहिले की, तेथील सर्व साखर कारखाने कसे इथेनॉल उत्पादन करतात. यातून ही योजना समोर आली आहे.
ते म्हणआले की, आम्ही उसाचा रस, बगॅसचा वापर इथेनॉल उत्पादन करणे आणि त्याची विक्री करण्यासाठी केला जाईल. कारण कंपनीला उत्पन्नसाठी आणखी एखादा मार्ग मिळू शकेल. लाबासा येथील कारखान्यासाठी ब्राऊन शुगरला सफेद साखरेमध्ये बदलण्यासाठी एक स्वतंत्र प्लांट स्थापन करण्याच्या योजनेवर विचार केला जात आहे.
ते म्हणाले की, देशातील तीन साखर कारखान्यांनी केवळ ब्राऊन शुगरचे उत्पादन केले आणि यावरून साखर उद्योगाबाबत पूर्वीच्या अधिकारी व मंत्र्यांची दूरदृष्टीमधील कमतरता दिसून येते. मंत्री सिंह म्हणाले की, रकीराकी आणि लबासा येथील नियोजीत दोन प्लांटच्या पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले आहे. भारतामध्ये प्रती हेक्टर १०० टन उसाचे उत्पादन केले जाते. मात्र, फिजीमध्ये आम्ही हा टप्पा अद्याप गाठू शकलो नाही.