ऊस आणि साखर उत्पादन वाढविण्याची फिजीची योजना

सुवा : साखर मंत्रालयाने आगामी गळीत हंगामात १८ लाख टन आणि त्यापुढील वर्षी २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे फिजीचे ऊस मंत्री चरण जीत सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, पुढील चार वर्षांसाठी सरकारने साखर आणि ऊस उत्पादन वाढविण्याची योजना तयार केली आहे. सिंह म्हणाले की, आम्हाला असे वाटते साखर उद्योगाने एका इथेनॉल प्लांट सोबतच एक साखर रिफायनरी प्लांटच्या स्थापनेसाठी काम केले पाहिजे. येथे कच्च्या साखरेवर प्रक्रिया करुन तिचे रुपांतर सफेद साखरेत करता येईल आणि याचा स्थानिक व्यावसायिकांना पुरवठा केला जाईल. सध्या स्थानिक व्यावसायिक सफेद साखरेची आयात करीत आहेत.

मंत्री सिंह म्हणाले की, आम्हाला यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याची योजना तयार करावी लागेल. आणि हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. २०११ आणि २०२२ या दरम्यान, सर्वात कमी १.३ मिलियन टन ऊस उत्पादन झाले. तर सर्वाधिक ऊस उत्पादन १.८ मिलियन टन होते. हे ऊस उत्पादन १९९४ ते २०२२ पर्यंतचे सर्वात कमी आहे. गेल्या दहा वर्षात हेक्टरी सरासरी उत्पादन २०१२ तील ३७ टन प्रती हेक्टरवरुन २०२२ मध्ये ५० टन प्रती हेक्टरदरम्यान उतार-चढाव सुरू आहे. देशातील ऊस लागवड क्षेत्र १९९४ मधील ७३,००० हेक्टरवरुन घटून २०२२ मध्ये ३३,००० हेक्टरवर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here