देशात साखर पुरवठा सुरळीत असल्याचा फिजी शुगर कॉर्पोरेशनचा दावा

सुवा : देशभरातील काही सुपरमार्केटमध्ये साखर वितरण कमी झाल्याच्या चर्चेदरम्यान फिजी शुगर कॉर्पोरेशनने देशात साखरेची कमतरता नाही. साखर पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला आहे.

फिजी शुगर कॉर्पोरेशनचे व्यवसाय अधिकार सचिन देव यांनी सांगितले की, कंपनीच्या विक्री विभागाची टीम व्यापाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. तर फिजी ग्राहक परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा शांडिल यांनी सुपरमार्केटमध्ये साखरेची कमतरता असल्याच्या तक्रारी परिषदेकडे आल्याचे सांगितले. शांडिल यांनी सांगितले की, सध्याच्या कोरोना महामारीच्या प्रकोपाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाजाराची पाहणी आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या माध्यमातून परिषदेला सुपर मार्केटमध्ये साखरेची कमतरता असल्याचे आढळले. पुरवठ्याच्या साखळीवरील ताण कमी करण्यात आला आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खरेदी आणि साठेबाजीला प्रोत्साहन मिळाल्याची स्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here