फिजी शुगर कॉर्पोरेशनच्या (एफएससी) तीन साखर कारखान्यांनी एक ऑगस्टअखेर २,८३,००० टन उसाचे गाळप करून २४,००० टन साखरेचे उत्पादन केले आहे.
चालू हंगामासाठी एक टन उसापासून साखर उत्पादनाचे प्रमाण ११.९१ टक्के आहे. याचा अर्थ एफएससीने या कालावधीत एक टन साखर बनविण्यासाठी ११.९१ टन उसाचे गाळप केले आहे.
दरम्यान, तिन्ही साखर कारखाने आपल्या उत्पादन क्षमतेपेक्षा कमी गाळप करीत असल्याचा आक्षेप राष्ट्रीय किसान संघाने (एनएफयू) घेतला आहे. त्यामुळे ऊस घेऊन आलेल्या ट्रक चालकांना ऊस कारखान्यांना देण्यासाठी दीर्घकाळ वाट पहात राहावी लागत असल्याचे सांगितले जाते.
एनएफयूचे महासचिव महेंद्र चौधरी यांनी सांगितले की, तिन्ही साखर कारखान्यांची कामगिरी अतिशय खराब आहे. त्यावर एफएससीकडून काहीही केले जात नसल्याची बाब धक्कादायक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link