माळेगाव साखर कारखाना देणार प्रती टन ३६३६ रुपये अंतिम दर : चेअरमन केशवराव जगताप

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये १३,२७,९०८.६५३ मे. टन ऊस गाळप केला. सरासरी १२.०२३ टक्के साखर उताऱ्यासह एकूण १५,२०,००० किंटल साखर पोती उत्पादन झालेआहे. संचालक मंडळाने या हंगामामध्ये गाळप केलेल्या सभासदांचे ऊसास ३६३६ रुपये प्रती टन अंतिम ऊस दर जाहीर केला आहे, अशी माहिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप यांनी दिली. तर गेटकेन गाळप केलेल्या उसास रुपये ३२०० प्र. मे. टन प्रमाणे अंतिम दर मिळेल असे त्यांनी सांगितले.

चेअरमन केशवराव जगताप म्हणाले की, कारखान्याने जाहीर केलेला भाव हा राज्यांत उच्चांकी स्वरुपाचा आहे. त्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापन, तोडणी वाहतूकदार, सभासद व कर्मचारी यांचेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या उच्चांकी ऊस दरामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन, कर्मचारी, अधिकारी यांचे मोठे योगदान आहे. कारखान्याच्यावतीने व्हरायटी ऊसास अनुदान रुपये १०० व खोडवा अनुदान रुपये १५० प्र.मे.टन असे एकूण सभासदांना व्हरायटी ऊस धारकास ३७३६ रुपये प्र. मे.टन, खोडवा ऊस धारकास ३७८६ रुपये प्र. मे.टन याप्रमाणे भाव मिळणार आहे. हंगामातील ३६९४.३१ रुपये एफआरपीमधून ऊस तोडणी वाहतूक खर्च ८६३.६४ वजा जाता निव्वळ देय एफआरपी २८३०.६७ रुपये प्र. मे. टन आली आहे. शेतकऱ्यांना ३००० रुपयांचा पहिला हप्ता व सभासदांना खोडकी अनुदान रुपये २०० प्र. मे. टन अदा केलेले आहे. उर्वरित देय रक्कमेपैकी सभासदांना रुपये २५० प्र. मे.टन व गेटकेन धारकांना रुपये १०० प्र.मे. टनाप्रमाणे दिपावलीपूर्वी तर उर्वरित पेमेंट रक्कम मकर संक्रातीपूर्वी अदा केली जाईल.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here