अखेर मोदी सरकारकडून ‘CAA’ची अधिसूचना जारी

नवी दिल्ली : अखेर अख्ख्या देशाचे लक्ष लागलेल्या ‘CAA’ची अधिसूचना जारी झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार ने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सीएएची (नागरिकत्व सुधारणा विधेयक) अधिसूचना जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ३ देशांमधील अल्पसंख्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

धार्मिक छळामुळे या तीन देशांमधून भारतात आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. हिंदू , बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन या सहा धार्मिक अल्पसंख्यांक लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान ११ वर्षे राहणे आवश्यक आहे. परंतु, सीएएमुळे ही अट शिथील होऊन सहा वर्षांवर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here