नवी दिल्ली: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशातील विविध उद्योग आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेत्यांशी चर्चा केली. उद्योग आणि असोसिएशन संबंधीच्या विषयांबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली.
अर्थमंत्री सीतारमण यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. केंद्र सरकार विविध स्तरावर कोविड १९शी लढा देत असल्याचे त्यांनी उद्योग जगतातील नेत्यांना सांगितले. राज्य सरकारांशी सामंजस्य राखून काम सुरू आहे. कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटकर, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (फिक्की) उदय शंकर, बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सचे देब मुखर्जी, बेंगलोर चेंबर ऑफ कॉमर्सचे टी. आर. परशुरामन आणि हिरो मोटोकॉर्पचे पवन मुंजाल यांचा यामध्ये समावेश होता.