Aithanoli Cibus Products द्वारे इथेनॉल युनिट स्थापन करण्याची योजना

तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील कागजनगर विभागातील मेटपल्ले गावात इथनोली सायबस प्रॉडक्ट्सच्यावतीने (Aithanoli Cibus Products) एक धान्यावर आधारित इथेनॉल निर्मिती प्लांट उभारण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

या युनिटमध्ये २०.२६ एकर जमिनीवर १०० केएलपीडी क्षमतेच्या एकूण उत्पादनासह तीन मेगावॅटचा सह वीज उत्पादन प्रकल्पसुद्धा स्थापन केला जाणार आहे.

Aithanoli Cibus Products ला या प्लांटच्या उभारणीसाछी जून २०२३ मध्ये पर्यावरण मंत्रालय, वन व हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने (MoEF&CC) पर्यावरण मंजुरी (EC) देण्यात आली आहे.

याबाबत Projects Today मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनी आपल्या या निर्माणाधिन प्रकल्पासाठी आर्थिक व्यवस्थापन व समायोजन (closure and consent to establish/CTE) अहवालाची प्रतीक्षा करीत आहे.

डिसेंबर २०२३ पर्यंत या प्रकल्पावर काम सुरू होईल, अशी अपेक्षा कंपनीला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here