Aithanoli Cibus Products कडून इथेनॉल युनिट स्थापन करण्याची योजना

इथनोली सायबस प्रॉडक्ट्स (Aithanoli Cibus Products) तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील मेटपल्ले गावात, कागजनगर विभागात एक धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्याची योजना तयार करीत आहे.

हे युनिट २०.२६ एकर जमिनीवर असेल. तर याची एकूण उत्पादन क्षमता १०० केएलपीडी असेल. यासोबतच तीन मेगावॅट सह वीज उत्पादन प्लांटसु्द्धा स्थापन करण्यात येणार आहे.

जून २०२३ मध्ये योजनेसाठी Aithanoli Cibus Products ला पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून (MoEF&CC) पर्यावरण मंजुरी (EC) देण्यात आली होती.

याबाबत Projects Today मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनी आपल्या नव्या उत्पादन युनिटसाठी आर्थिक तयारी आणि उभारणीबाबत सहमती (closure and consent to establish/CTE) ची प्रतीक्षा करीत आहे.
यासोबतच प्लांटचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here