मुरादाबाद : उसाच्या थकबाकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी ऊस विभाग आणि साखर कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना जर लवकर उसाचे पैसे अदा केले नाहीत तर त्यांच्याविरोधात एफआरआर दाखल करून कारवाई केली जाईल असा इशारा दिला.
गळीत हंगाम संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. साखर कारखान्यांकडे अद्याप २४५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कारखान्यांना यापूर्वी पैसे देण्याबाबत सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी शैलेंद्र सिंह यांनी आपल्या कॅम्प कार्यालयात जिल्ह्यातील चारही साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी चालू हंगामातील ऊसाची थकबाकी, विकास अंशदान आणि गेल्या वर्षातील उस थकबाकी आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी अगवानपूर साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वात कमी ५८ टक्के ऊस बिले दिली असल्याचे उघड झाले.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १२१ कोटी रुपये थकवले आहेत. बिलारी कारखान्याने ७४ टक्के पैसे दिले आहेत. तर ६० कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. याशिवाय रानीनांगल आणि बेलवाडा या कारखान्यांकडेही शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अगवानपूर आणि बिलारी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. जिल्हा ऊस अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना इशारा दिला आहे. लवकर पैसे अदा केले नाहीत तर एफआयआर दाखल केला जाईल असे सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link