हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
हिंगोली: चीनी मंडी
वसमत येथील पूर्णा साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीत सुमारे २५ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. कारखान्यातील बगॅससह इतर साहित्य बुधवारी पहाटे जळाले. कारखान्यातील यंत्रसामुग्री जळून खाक झाल्याने नुकसान झाले. कारखान्यातील कर्मचारी आणि वसमत नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवली.
पूर्णा कारखान्यात दोनवेळा आगीचा प्रकार घडला. आधी मंगळवारी रात्री आग लागली. ती कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पहाटे प्रयत्नांची शिकस्त करून बुधवारी पहाटे नियंत्रणात आणली. मात्र, नंतर बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा कारखान्यात आग लागली. या आगीत बगॅस कॅरिअर साहित्य, वायरिंग आणि बेल्ट रोटर आदी साहित्य जळाल्याने सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आली. वसमत नगरपालिकेचे अग्निशामक दल आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले