आंध्र प्रदेशातील काकीनाडामध्ये साखर कारखान्यात आग, दोघांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे शुक्रवारी एका साखर कारखान्यामध्ये लागलेल्या आगीत दोनजणांचा मृत्यू झाला आणि इतर सहाजण जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी नजिकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. घटनेनंतर त्वरीत वीज विभाग, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी येथे पाहणी केली.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ANIने दिलेल्या वृत्तानुसार, काकीनाडाचे एसपी रवींद्रनाथ बाबू यांनी सांगितले की, काकीनाडाजवळील वकालापुडी साखर कारखान्यात ही आगीची भीषण दुर्घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतर सहाजण जखमी झाले आहेत. आणि एकजण गंभीर जखमी आहे. कारखान्यातील कन्व्हेअर बेल्टमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. या कन्व्हेनर बेल्टचा वापर साखरेच्या बॅग लोड करण्यासाठी केला जातो. जखमींना त्वरीत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभाग, वीज विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here