सोलापूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीच्या काळात वेळेत ऊस बीले शेतकऱ्यांना देण्यासाठी ओंकार साखर कारखाना परिवार कटिबध्द आहे. कारखान्याच्या चांदापुरी युनिट एकने ३० नोव्हेंबरपर्यंतचा पहिला हप्ता व ऊस वाहतुकदरांची बीले बँक खात्यावर जमा केली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिला हप्ता २७०० रुपयांप्रमाणे दिला आहे, अशी माहिती चेअरमन बाबूराव बोत्रे – पाटील यांनी दिली.
कारखान्याचे विस्तारीकरण व उपपदार्थ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, असेही त्यांनी सांगितले. चेअरमन बोत्रे-पाटील म्हणाले की, कारखान्याकडून शेतकऱ्यांना जे देणे शक्य आहे, ते दिले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याकडे पाठवावा. यावेळी ओंकार परिवाराच्या संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील,संचालक प्रशांत बोत्रे पाटील, जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे आदी उपस्थित होते.