लोकनेते कारखान्याकडून पहिला हप्ता बँकेत वर्ग : चेअरमन विरेंद्र सोळंके यांची माहिती

बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचा २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम सुरु असुन दि. ११ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन रुपये २७०० प्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी यांचे बँक खाती जमा केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी दिली.

या चालू गळीत हंगामामध्ये आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे ऊस गाळप सुरु असुन दि. ११ जानेवारी २०२४ अखेर ६७ गाळप दिवसामध्ये ३४०२०० मे.टन ऊसाचे गाळप करुन ९.७२ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १९११५० क्विटल साखरेचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. चालू हंगामात कारखान्याकडील इथेनॉल व को. जन प्रकल्प कार्यान्वीत असून आजअखेर सिरप इथेनॉल ६६४७५७६ लिटर आणि बी. हेवी इथेनॉल १२४२५७४ लिटरचे उत्पादन करण्यात आलेले आहे. कारखान्याने १५३२१६०० युनीट विज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीस वितरीत केलेली आहे.

दि. १० जानेवारी २०२३ पर्यंत गाळप झालेल्या ऊसाचा पहिला हप्ता रुपये २७०० प्रमाणे होणारी रक्कम यापूर्वीच ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग करण्यात आलेली होती. पुढील कालावधीत म्हणजेच दि. ११ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३७७०३.७७५ मे.टन गाळप झालेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती मे.टन रु.२७०० प्रमाणे होणारी एकुण रक्कम रुपये १०.१८ कोटी ही दि. ११ जानेवारी २०२४ रोजी संबंधीत ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केलेली आहे. ज्या ऊस उत्पादकांचा ऊस गाळपास आलेला आहे त्यांनी आपल्या नजिकच्या बँकेशी संपर्क साधुन आपल्या ऊस बिलाची रक्कम घेवून जावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here