सोलापूर : विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगाव (ता. माढा) या साखर कारखान्याच्या मागील हंगाम सन २०२२-२३ मध्ये झालेल्या ऊस गळितास प्रति मे. टन १०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता व चालू हंगामातील २७०० रुपयांप्रमाणे ऊसबिल उत्पादक सभासद व बिगर सभासद यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आल्याची माहिती संस्थापक-चेअरमन, आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
कारखान्याचा १६ वा गाळप हंगाम सुरू झाला असून कारखान्यास ऊस पुरवठा पुरेशा प्रमाणामध्ये होत आहे. सर्व तोडणी वाहतूक कंत्राटदार व ऊस उत्पादक शेतकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून चालू गाळप हंगाम २०२३-२४ करिता कारखान्यास गाळपास आलेल्या ऊस बिलापोटी १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत २७०० रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता सर्व शेतकरी ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
या प्रसंगी विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा, असि. जनरल मॅनेजर वैभव काशीद, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, चिफ केमिस्ट प्रदीप केदार, डिस्टिलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, परचेस अधिकारी कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे आदी उपस्थित होते.