भाऊराव चव्हाण साखर कारखान्याची पहिली उचल २५०० रुपये : चेअरमन गणपतराव तिडके

नांदेड : माजी मुख्यमंत्री व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके व संचालक मंडळाने भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे.

केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार चालू गळीत हंगाम संपल्यानंतर सरासरी साखर उताऱ्यावर एफ. आर. पी. निश्चित करून उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिला असून मागील वर्षीच्या गळीत हंगामाच्या एफ. आर.पी. प्रमाणे २३८ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

ते म्हणाले, सभासदांनी व शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस भाऊराव चव्हाण कारखान्यास पुरवठा करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन गणपतराव तिडके, व्हाईस चेअरमन नरेंद्र चव्हाण व सर्व संचालकांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या मुहूर्तावर यावर्षीची संपूर्ण एफआरपी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली आहे, अशी माहिती भाऊराव चे संचालक व्यंकटराव साखरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here