अहिल्यानगर : नेवासे तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो ॲग्री इ. लि. (महालक्ष्मीनगर, माळेवाडी दुमाला) या साखर कारखान्याने उसाला प्रथम हप्ता प्रतिटन २८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तुटलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती स्वामी समर्थ शुगर कारखान्याचे चेअरमन, आमदार विजय शिवतारे यांनी दिली.
आमदार विजय शिवतारे म्हणाले, उसाला चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवावी, अशी मागणी केलेली आहे. कारखान्याच्या कार्यकारी संचालक डॉ. ममता शिवतारे-लांडे म्हणाल्या की, आजअखेर कारखान्याकडून ४१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झालेले असून, आमचे ३ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या म्हणाल्या, पुढील हंगामात कारखाना वेळेवर सुरू करून ११ ते १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवून उच्चांकी ऊस दर देणार आहोत. तसेच नेवासासह शेवगाव व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी गळीत हंगाम २०२५-२६ करिता जास्तीत जास्त नवीन ऊस लागवड करून, तसेच खोडवा उसाच्या नोंदी लवकरात लवकर देऊन कारखान्यास सहकार्य करावे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.