सोलापूर : सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी ४३ अर्ज दाखल झाले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, २१ संचालक निवडीसाठी सोमवारी, अंतिम दिनापूर्वी २२ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्र दाखल केले. सोमवारी १८ जणांनी १९ अर्ज दाखल केले. एकूण ४० उमेदवारांचे ४३ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, विद्यमान चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यापूर्वी दोन व सोमवारी एक असे तीन अर्ज दाखल केले आहेत.
उत्पादक सहकारी संस्था व बिगर उत्पादक सहकारी संस्था, पणन संस्था प्रतिनिधी गटातून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे दोन अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय, मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, भानुदास सालगुडे-पाटील, गोपाळ गोरे, बाळासाहेब माने, दत्तात्रय रणवरे, कुमार पाटील, लालासो रणनवरे, भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर, आप्पा माळी, मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, आनंदा मुळीक, सुभाष सुळ, सदाशिव वाघमोडे पाटील, शिवाजी गोरे, रामहरी गोडसे, मधुकर वाघमोडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजित पाटील, नारायण वाघमोडे, दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील यांचे अर्ज दाखल झाले.