अहिल्यानगर : प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देऊन आपण राष्ट्रसेवा करू शकतो. विविध संस्कृतींनी नटलेल्या भारत मातेच्या विकासाची वाटचाल नव्या पिढीने आपल्या ज्ञानाने अधिक गतिमान करावी. भारत जगाच्या पातळीवर एक शक्तीशाली देश म्हणून पुढे येतो आहे, असे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे ध्वजवंदन त्यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी कोल्हे कारखाना येथे संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर होन, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, निवृत्ती बनकर, निलेश देवकर, ज्ञानेश्वर परजणे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बापूसाहेब बाराहाते, त्र्यंबकराव सरोदे, विलासराव माळी, बाळासाहेब पानगव्हाणे आदी उपस्थित होते.
श्री गणेशनगर सहकारी साखर कारखाना येथील कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे सुरेख सादरीकरण केले. कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हा. चेअरमन विजय दंडवते, संचालक भगवान टिळेकर, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, संपत हिंगे, आलेश कापसे, विष्णुपंत शेळके, अरविंद फोफसे, महेंद्र गोर्डे, राहुल गाढवे, संजय गाढवे, एम. डी. नितीन भोसले आदी उपस्थित होते.