बेळगाव, बागलकोटमध्ये सुरू होणार फ्लेक्स फ्युएल स्टेशन

बेळगाव : निरानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्यावतीने पुढील काही महिन्यांत बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यात फ्लेक्स फ्यूएल स्टेशन्सची एक श्रृंखला सुरू केली जाणार आहे. निरानी समुहाची सहाय्यक कंपनी TruAlt Energy Solutions LLP या केंद्रांवर नव्या जमान्यातील या इंधनाची साठवणूक आणि विक्रीसाठी कार्यरत असेल. भविष्यात अशी २१ केंद्रे सुरू होतील अशी अपेक्षा आहे. या मालिकेतील पहिले केंद्र बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे सुरू होईल.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनीने सांगितले की, देशातील हे अशा प्रकारचे पहिले डिस्बर्सल सेंटर असेल. अशी सात केंद्रे बागलकोटमध्ये आणि १४ बेळगावमध्ये सुरू केली जाणार आहेत. फ्लेक्स फ्यूएल म्हणजे फ्लेक्सिबल फ्यूएल. हे नव्या जमान्यातील इंधनपेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करते. निरानी समुहाचे सहा कारखाने असून त्यांची एकूण गाळप क्षमता ७०,००० टन प्रती दिन आहे. साखर कारखाने दररोज सुमारे २,४०० किलोलीटर इथेनॉलचे उत्पादन करतात. ही क्षमता अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे. कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फ्लेक्स फ्यूएल स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांसाठी सीएनजी, इथेनॉलमिश्रीत पेट्रोल आणि चार्जिंगची सुविधा देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here