सोलापूर : कोरोना महामारीच्या प्रकोपाला रोखण्यासाठी पूर्ण देशामध्ये लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाउन मुळे लाखो लोकांना आपल्या नोकर्या सोडाव्या लागल्या. अशा स्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या दारफळ गावातील एक युवक विशाल बारबोले यांना साखर कारखान्यात चांगल्या पगारासह नोकरी मिळाली. यानंतर विशालच्या मित्रांनी त्याच्या नावाचे पोस्टर गावात लावले आणि यावर त्याला नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदनासह त्याचा पगारही लिहिला. ज्यामुळे हे पोस्टर बघता बघता सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि एका रात्रीतच विशाल प्रसिद्ध झाला.
दारफळ गावातील निवासी विशाल 10 वी पास होता आणि त्याने आईटीआइ चा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. त्यांना मोहोळ तालुक्यातील औदुंबरराव पाटील साखर कारखान्यामध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून नोकरी लागली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.