पाकिस्तानमध्ये शेतकरी आणि जमीनदारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. देशातील विनाशकारी पुरामुळे बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील शेतजमीन आणि पिके नष्ट झाली आहे. त्यामुळे लोकांसमोरील आर्थिक संकट वाढले आहे.
याबाबत, Dawn मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकार १० दिवसांत मदतीचे पॅकेज देण्यात अपयशी ठरल्याबद्दल किसान इत्तेहाद पाकिस्तानचे अध्यक्ष खालिद हुसेन यांनी इस्लामाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणि डी-चौकात उत्पादक शेतकरी आणि जमीनदारांसह जोरदार निदर्शने करू, असा इशारा दिला आहे.
हुसेन म्हणाले की, जर या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणि ५ रोजी डी-चौकात धरणे आंदोलन केले जाईल. गेल्या काही महिन्यात आलेल्या भयंकर पुरामुळे बलूचिस्तान आणि सिंध प्रांतात ७० टक्के शेत जमीन आणि पिके नष्ट झाली आहेत.