कोल्हापूर : यंदा महापुरामुळे गेल्या १५ दिवसापासून ऊस पिक पाण्यात बुडून मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने २०२२-२३ या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला ३००० रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रती टन १०० रुपये व ३,००० पेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये दुसरा हप्ता देण्याबाबत सरकारकडून घोषणा केली होती. परंतु मागील हंगामात तुटलेल्या उसाच्या जादा दराचा प्रस्ताव शासन दरबारी लटकला आहे. महापुराचा तडाखा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दुसरा हप्ता देण्याची मागणी केली जात आहे.
स्वाभिमानीने मागील हंगामात केलेल्या आंदोलनानंतर पुढील दोन महिन्यात जादा दर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सरकारने टाळाटाळ केली. लोकसभा निवडणुकीमुळे प्रस्ताव प्रलंबित राहिला. प्रस्ताव मंजूर झाल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपये मिळाला असते. या प्रश्नाचा सातत्याने स्वाभिमानीने पाठपुरावा केला आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.