हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
राज्यातील साखर कारखान्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डरनुसार संबंधित कारखान्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे. केंद्र सरकारने शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डरनुसार जाहीर केलेल्या साखरेच्या हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री होणार नाही, याची दक्षता साखर कारखान्यांनी घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांना हे पत्रक देण्यात आले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डर २०१८नुसार ७ जून २०१८ रोजी एक अधिसूचना जारी केले आहे. त्यामध्ये शुगर स्टॉक होल्डिंग लिमिट दिलेली आहे. केंद्राने साखर साठ्या संदर्भात ७ जून २०१८ रोजी शुगर प्राईस कंट्रोल २०१८ मध्ये जे बदल केले. त्यानुसार दर महिन्याला साखर विक्री करण्या संदर्भात रिजील मॅकेनिझम प्रमाणे आदेश दिले आहेत. या आदेशांमुळे साखरेची राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठेतील किंमत स्थिर राहिलेली आहे. साखरेचे झालेले अतिरिक्त उत्पन्न विचारात घेता जून २०१८ पूर्वीच्या काही महिन्यांमध्ये साखरेची किंमत कमी होत होती. केंद्राने सदर शासन निर्णयानुसार हस्तक्षेप करून साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी साखरेची किमान किंमत २९ रुपये प्रति किलो केली होती होती. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ही किंमत दोन रुपयांनी वाढवून ३१ रुपये प्रति किलो केली होती. ही किंमत बाजारातमध्ये किमान किंमत म्हणून कायम राखण्यासाठी शुगर रिलिज मॅकेनिझमप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांना साखरेची योग्य किंमत मिळण्यासाठी शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डर २०१८चे पालन करणे आवश्यक आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp