केएम शुगरची 3.83 कोटी रुपयेची साखर जप्त

आयोध्या : केएम शुगर मधील साखरेची पोती अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम यांना अनुरुप नव्हती त्यामुळे केएम शुगर लिमिटेड, मोतीनगर, येथील साखर जप्त करण्यात आली आहे. प्रदेशातील अनेक कारखान्यातील साखर पोत्यांमध्ये घोटाळ्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला मिळत होत्या. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याबाबत कारवाई केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या टीमद्वारे कारखान्याच्या मोतीनगर मधील साखरेच्या गोदामाचे निरिक्षणादरम्यान, साखरेची पोती मानक च्या अनुरुप नव्हती त्यामुळे प्रशासनाने 11,394 क्विंटल साखर सील केली. जवळपास 3.83 करोड रुपये जप्त करण्यात  आलेल्या साखरेची  किंमत सांगितली जात आहे.  अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्या आदेशानुसार मसौधा साखर कारखन्याच्या दोन आणि तीन नंबरच्या गोदामात साखरेचा स्टॉक, साखरेचा दर्जा आणि पॅकेटसचे निरिक्षण करण्यात आले. यावेळी 50 किलोच्या पॅकमध्ये 11,394 क्विंटल साखर मिळून आली.

या पॅकेटसवर असणार्‍या सूचना आणि नियम अन्न सुरक्षा एवं मानक अधिनियम यांना अनुरुप नव्हत्या. या कारवाई दरम्यान, कर्मचार्‍यांनी सहकार्य न केल्याचा आरोपही करण्यात आला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here