चार वर्षात प्रथमच जून महिन्यात ऊस उत्पादकांना सर्वाधिक पैसे

मुरादाबाद : निवडणुकांचे वर्ष असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आता सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहे. शेतकऱ्यांना यावर्षी जून महिन्यात उच्चांकी पैसे देण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांना कधीच एवढे पैसे मिळालेले नाहीत. यंदा जून महिन्यात ७५ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत.

ऊस विभाग स्वतःचे कौतुक करीत आहे. योगी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या, अडचणी सोडविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे अधिकारी सातत्याने बैठका घेत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पैसे न देणाऱ्या कारखान्यांना नोटिसाही दिल्या आहेत. त्यामुळे जून २०२१ मध्ये सर्वाधिक पैसे दिले गेले आहेत. २०१७-१८ नंतर एवढे पैसे कधीच दिले गेले नव्हते. जूनच्या अखेरीस ८० टक्के पैसे दिले गेल्याचे ऊस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्हा ऊस अधिकारी अजय सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळावेत यासाठी साखर कारखान्यांवर दबाव वाढवला आहे. परिणामी यंदा ७८८६८.८९ लाख रुपये दिले गेले आहेत.

जे कारखाने पैसे देणार नाहीत, त्यांच्यावर आरसी अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अधिकारी याबाबत कडक भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here