देशामध्ये सलग सहाव्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाखापेक्षा कमी

नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 77 लाखावर पोचली आहे, तर कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 68 लाखा वर गेली आहे. गेल्या 24 तासात 55,839 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण कमी होवून ती संख्या 7 लाख 15 हजारावर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, कोविड 19 चे 55,839 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे देशातील कोरोनारुग्णांची संख्या 77,06,946 पर्यंत पोचली आहे. तर 702 आणखी मृत्यु झाल्याने देशामध्ये कोरोनामुळे मरणार्‍या रुग्णांची संख्या 1,16,616 पर्यंत पोचली आहे. देशामध्ये एकूण 68,74,518 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. ज्यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 89.20 टक्के झाला आहे. तर मृत्युदर 1.51 टक्के आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here