देशाचा परकीय चलन साठा आला ५७०.७४ अब्ज डॉलरवर 

नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सतत चढ-उतार होत असतात. या आठवड्याच्या आकडेवारीत परकीय चलनाच्या साठ्यात घट नोंदवली गेली आहे. १२ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा २.२३ अब्ज डॉलरने घसरून ५७०.७४अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, १२ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या परकीय चलन मालमत्तेतील घट झाली आहे. यापूर्वी, ५ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ८९७ दशलक्ष डॉलरने घसरून ५७२.९७ अब्ज डॉलरवर झाला होता.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, परकीय चलन मालमत्ता या आठवड्यात २.६५ अब्ज डॉलरने घसरून ५०६.९९ अब्ज डॉलर झाली आहे. डॉलरमधील परकीय चलनाच्या साठ्यामध्ये युरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमध्ये होणारे मूल्यवृद्धी किंवा अवमूल्यन यांचा समावेश होतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, समीक्षाधीन आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३०५ दशलक्ष डॉलरने वाढून ४०.६१ अब्ज डॉलर झाले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात भारतातील सोन्याची मागणी ४३ टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here