शेअर्समधील तेजीदरम्यान अदानींना परदेशी गुंतवणूकदारांचा झटका

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यवसायाबाबत अमेरिकेची रिसर्च फर्म हिंडनबर्गचे संकट कमी होताना दिसत आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. मात्र, शेअर्सच्या तेजी आणि नेटवर्थमध्ये वाढीदरम्यान, पुन्हा एकदा विदेशी गुंतवणुकदारांकडून वाईट वृत्त समोर आली आहे. फ्रान्सच्या एका बड्या कंपनीने त्यांच्या प्रोजेक्टमध्ये ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक होल्डवर ठेवली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी ग्रुपला फ्रान्सच्या टोटल एनर्जीजकडून मोठा झटका बसला आहे. अदानींच्या कंपनीच्या या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांनी निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांनी अदानी ग्रुपच्या ५० अब्ज डॉलरच्या हायड्रोजन प्रोजेक्टमधील गुंतवणूक होल्डवर ठेवली आहे. बिझनेस स्टँडर्डवर रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, टोटल एनर्जीने सांगितले की, यूएस बेस्ड शॉर्ट सेलर हिंडनबर्गकडून अदानी ग्रुपवर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत ऑडिट रिपोर्ट येईपर्यंत या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार नाही. गेल्या वर्षी २०२२ मध्ये जून महिन्यात फ्रान्सच्या फर्म टोटल एनर्जीला अदानी न्यू इंडस्ट्रिज लिमिटेडमध्ये २५ टक्के हिस्सेदारी घ्यायची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here