किच्छा : माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक मौन व्रत धारण करून ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने भात खरेदीमध्ये मुद्दाम विलंब करून शेतकऱ्यांचे शोषण चालवले आहे असा आरोप त्यांनी केला.
मुसळधार पाऊस सुरू असताना माजी मुख्यमंत्री रावत कार्यकर्त्यांसमवेत सायंकाळी साखर कारखाना परिसरात पोहोचले. त्यांनी साखर कारखान्यासमोर शेडमध्ये अर्धा तास मौनव्रत धारण करून धरणे धरले. आंदोलनाची समाप्ती केल्यानंतर रावत यांनी सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांचे शोषण सुरू असल्याचा आरोप केला. भाताच्या खरेदीत मुद्दामहून उशीर केला जात असून शेतकऱ्यांना मिळेत त्या किमतीला भात विकण्यास सरकार भाग पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार मध्यस्त, दलालांना पाठीशी घालत असून त्याचा फायदा व्हावा यासाठी खरेदीचा वेग कमी केला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन खुल्या बाजारात आपले पिक विकण्याचा निर्णय घेत आहेत असे ते म्हणाले. काँग्रेस शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढत आहे. त्यांना हक्क मिळवून दिले जातील असे ते म्हणाले.
कारखान्यासमोरील आंदोलनानंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी उत्तराखंड डेअरी फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष दीप सिंह डांगी यांच्या घरीत जाऊन त्यांचे वडील जोधा सिंह डांगी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तिलक राज बेहड, माजी खासदार प्रदीप टम्टा, माजी आमदार हरीश दुर्गापाल, सुरेश पपनेजा, संजीव कुमार सिंह, नारायण बिष्ट, विनोद कोरंगा, जगरुप सिंह गोल्डी, अक्रम खान, फजल खान, हसीब खान, फिरासत खान आदी उपस्थित होते.