राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निवड

नवी दिल्ली : राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज (१६ फेब्रुवारी) राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या उपाध्यक्षपदी गुजरात मधील केतनभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकार साखर संघावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची सदस्यपदी निवड झाली आहे.

या निवडीच्या पार्श्वभूमीवर ‘चीनीमंडी’शी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड मी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन. या पदाच्या माध्यमातून देशाच्या साखर उद्योगाच्या विकासात भर घालण्याचा माझा प्रयत्न राहील. साखर उद्योगातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी पावले उचलली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here