कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर निर्यातीवर निर्बंध लागू करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत जोरदार टीका केली आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पहिल्यांदा गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशाच पद्धतीने केंद्र सरकारने एक जूनपासून साखर निर्यातीवर निर्बंध लागू करीत आहे. हा निर्णय केवळ ऊस उत्पादक शेतकरी नव्हे तर देशातील साखर उद्योगावर विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे.
शेट्टी म्हणाले की, निर्यातीबाबत कोणताही नवा करार केला गेला नाही, तर देशातील साखर उद्योगासमोर संकट उभे राहिल.